“या” प्रकरणामुळे पंकजा मुंडे यांना चढावी लागली खंडपीठाची पायरी

कोरोनाच्या कालावधीत प्रशासनाकडून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा व दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. हाच दाखल करण्यात आलेला गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करणारा विनंती फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता.

“या” प्रकरणामुळे पंकजा मुंडे यांना चढावी लागली खंडपीठाची पायरी

कोरोनाच्या कालावधीत प्रशासनाकडून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा व दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. हाच दाखल करण्यात आलेला गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करणारा विनंती फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता. कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पारंपारिक दसरा मेळावा जास्तीत जास्त ५० लोकांच्या सोबत घेण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने तहसीलदाराकडून केवळ ५ लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. केवळ पाच लोकांची परवानगी असल्यामुळे पोलिसांनी याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हाच गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर प्रतिवादी राज्य शासन आणि पोलीस कर्मचारी यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

दरवर्षी सावरगाव घाट येथे पंकजा मुंढे यांच्या उपस्थिती दसरा मेळाव्याचे आयोजन करता येते. संत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेले सावरघाट म्हणजेच भक्तीगडावर दरवर्षी पारंपरिक दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र २०२० मध्ये राज्यात कोरोनाची परस्थिती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे याकाळात कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. २०२० या सालात कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातला होता त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. याचवेळी पारंपरिक दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आयोजकांकडून २५ ऑक्टोबर २०२० साली प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र त्यावेळी बीड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याकारणाने पाटोद्याच्या तहसीलदारांनी पाच लोकांच्या उपस्थितीला संमती दिली होती. मात्र त्यावेळी दसऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. म्हणून आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस कर्मचारी यांनी केली. परवानगी नसतानाही भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार श्रीराम धोंडे, जि. प. सदस्या सविता गोल्हार, मेळाव्याचे आयोजक संदेश सानप, सावरगाव घाटचे सरपंच रामचंद्र सानप यांच्यासह ४० ते ५० जणांनी प्रतिबंधात्मक आदेश, कोरोनाच्या अटी मोडल्याची तक्रार पोलिसांनी केली असून पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोरोनाच्या काळात प्रशासनाकडून लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंढे यांनी औरंगाबाद खंडपीठात आलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करणारा विनंती फौजदारी अर्ज दाखल केला. या दाखल केलेल्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड. चाटे यांनी खंडपीठासमोर आपली बाजू मांडताना, संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा व तपास करण्याचा पोलिसांना अधिकार नाही.

हे ही वाचा:

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

नाशिकला नवे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त कधी मिळणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version