spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Assembly Election 2024: आमच्या वाट्याला येतील त्या जागा… Pankaja Munde यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महत्वपूर्ण बैठका गेल्या दोन दिवस पार पडत आहेत. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) , सहप्रभारी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav), केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal), राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Viod Tawade), विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या उपस्थितीत हि बैठक पार अडली. यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “आमच्या वाट्याला येतील त्या जागा व मित्र पक्षांच्या वाट्याला येतील त्या जागांवर आम्ही एकमेकांना मदत करणार आहोत,” असे वक्तव्य केले.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, “भाजप बैठकीमध्ये राज्यातील जागांविषयी आढावा घेण्यात आला. भाजप कोअर कमिटीची दोन तास बैठक झाली, त्यात गुरुवारी मराठवाडा – विदर्भचा आढावा घेण्यात आला. तर, शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रचा आढावा घेतला. आता कोकण – उत्तर महाराष्ट्रचा आढावा घेणार आहोत. तसेच, जागावाटपासोबतच ठिकठिकाणी महायुतीची ताकद वाढवण्यासाठी हालचाली करण्यात येणार आहेत. भाजप नेत्यांवर विभागवार जबाबदारी दिली जाणार आहे. “

पुढे त्या म्हणाल्या, “आजच्या बैठकीनंतर पुण्यात २१ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार २१ तारखेच्या बैठकी संदर्भात रूपरेषा ठरवली गेली. महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक दोन दिवस व्यवस्थित पार पडल्या. या बैठकीत अंत्यत विस्तृत आणि अभ्यासपूर्ण चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील जागांचा आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांबाबत एक व्यूहरचना आम्ही केली. आमचं अधिवेशन पुण्यात होतंय त्या दृष्टीने चर्चा झाली. त्याची रूपरेषा ठरली. प्रत्येक योजना सरकारने दिल्यात, त्यावर चर्चा झाली. सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न आता करणार आहोत. आमचा निश्चय झालाय. आमची सर्व मतदार संघाबाबत चर्चा झाली. आमच्या वाट्याला येतील त्या जागा व मित्र पक्षांच्या वाट्याला येतील तिथे आम्ही एकमेकांना मदत करणार आहोत

गेले दोन दिवस भाजपची कोअर कमिटी मिटिंग पुणे येथे पार पडत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हि बैठक पार पडत आहे. यावेळी बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, “महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर केवळ मोदी सरकार व महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना बंद पाडेल. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे शिवरायांच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. सरकारने तातडीने ही अतिक्रमणे हटवली पाहिजेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

“सगेसोयरे अध्यादेश सरकारने अमलात आणावा अन्यथा उपोषणात आता माघार नाही..” ; Manoj Jarange Patil यांनी दिला इशारा

Vidhansabha Election मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; Sharad Pawar यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss