‘पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं’, एकनाथ खडसेंचा सल्ला

मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये एकही महिला नेता नसल्यामुळे सर्व ठिकाणी चर्चांना उधाण सुरु झाले. त्यातच भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना देखील मंत्रिपद मिळाले नाही.

‘पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं’, एकनाथ खडसेंचा सल्ला

मुंबई :- मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये एकही महिला नेता नसल्यामुळे सर्व ठिकाणी चर्चांना उधाण सुरु झाले. त्यातच भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना देखील मंत्रिपद मिळाले नाही. या सर्व संबधी पंकजा मुंडे याना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, “मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. कदाचित अजून पात्रतेचे लोक असतील. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करताना असताना पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.

या सर्व पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath Munde) कुटुंबावर सातत्याने अन्याय होत असल्याची टीका प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी केली. “मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं,” असा मोलाचा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे याना प्रत्युत्तर देत गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “पंकजा मुंडे काय बोलल्या ते मी ऐकलेलं नाही, पण त्या नाराज असतील असं वाटत नाही. पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करतील आणि त्यांना अजून मोठं पद मिळेल,”.

 

हे ही वाचा :-

फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

 

Exit mobile version