Wednesday, September 25, 2024

Latest Posts

महागाई विरोधात लोकसभेत जाऊन घोषणाबाजी करणारे काँग्रेसचे चार खासदार निलंबित

लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन करायचे असेल तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावे, असेही ते म्हणाले होते. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे लोकसभेचे कामकाज 26 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत तात्पुरते थांबवण्यात आले आहे. परंतु काँग्रेसच्या खासदारांनी महागाईविरोधातील आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे काँग्रेसच्या या ४ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विरोधी खासदारांनी आज सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ या मुद्द्यांवर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. ओम बिर्ला म्हणाले, “हे लोकशाहीचे मंदिर आहे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. तुम्हाला चर्चा करायची असेल तर मी त्यासाठी तयार आहे, पण तुम्हाला सभागृहात फक्त फलक दाखवायचे असतील तर तुम्ही दुपारी 3 नंतर सभागृहाबाहेर करू शकता. देशातील जनतेला सभागृह हवे आहे. सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही”. असा इशारा लोकसभा अध्यक्षांनी दिला.

गेले अनेक दिवसांपासून महागाईवाढ होत आहे. या करणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे आणि महागाई व खाद्यपदार्थांवर अलीकडेच वाढवलेल्या जीएसटीबाबत आपली भूमिका मांडवी अशी मागणी आंदोलनकर्त्या काँग्रेस खासदारांनी केली आहे. तसेच १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महागाईबाबत चर्चा करावी, अशी मागणीही विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

युवसेनेचे प्रमुख आधी कुठे दिसत नव्हते ; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Latest Posts

Don't Miss