Parliament Winter Session आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होणार आहे. ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत २३ दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे.

Parliament Winter Session आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

Parliament Winter Session : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होणार आहे. ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत २३ दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेच अधिवेशन होणार होते. मात्र, गुजरात निवडणुकीमुळं हे अधिवेशन उशीरानं सुरु होत आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटपर्यंत म्हणजे २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान हे अधिवेशन २३ दिवसांचे असणार आहे. यामध्ये १७ बैठका होणार आहेत. या हिवाळी अधिवेशनात १६ विधेयके सादर केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक याचा समावेश आहे. संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार विविध मुद्यावरुन आज सभागृहात आवाज उठवू शकतात. भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर हमीभावाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, खासदार जयराम रमेश आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

हे ही वाचा : 

शाळा स्थलांतर प्रमाणपत्रा अभावी विध्यार्थींचे प्रवेश थांबवता येणार नाही, दीपक केसरकर यांची घोषणा

महाराष्ट्रामध्ये कोणीही कायदा हातात घेणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version