spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर गाडयांना मालगाडीच्या बोगी जोडण्यात याव्यात, सुप्रिया सुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर-पुणे पॅसेंजरला मालवाहून डबे जोडावेत, अशी मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. याशिवाय पुरंदरहून पुणे आणि कोल्हापूर बाजारपेठेत भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादने पोहोचवण्यासाठी पॅसेंजर रेल्वेला मालगाडीच्या बोगी जोडव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खा. सुळे यांनी ही मागणी केली आहे.

हेही वाचा : 

Raj Thackeray: राज ठाकरेंवर येणार बायोपिक? काय म्हणाले मनसे अध्यक्ष

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पुरंदर विभागातील ताजी फळे आणि भाजीपाला दररोज पुणे आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत नेला जातो आणि या बाजारपेठेत आपला शेतीमाल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना खाजगी वाहतूक वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. पुरंदर भागातील स्थानिक शेतकऱ्यांनी या मागणीचे कौतुक केले आहे.

अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर किरीट सोमय्यांचा हातोडा पडणार का? दापोलीतील राजकीय वातावरण तापलं

सुळे पुढे म्हणतात, “बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुका हा भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथून उत्तम दर्जाच्या ताज्या भाज्या, फळे आणि फुले पुणे आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठवली जातात, पण कोल्हापूर-पुणे दरम्यानच्या पॅसेंजर ट्रेनला मालवाहू डबे जोडलेले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची वाहतूक खासगी वाहनांतून करावी लागते, जी खूप महाग असते. जर या पॅसेंजर ट्रेनला मालवाहू डबे जोडले गेले तर येथील शेतकरी आपला माल या बाजारपेठेत सहज आणि परवडणाऱ्या किमतीत पाठवू शकतील, असेही पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

जेजुरी हे तीर्थक्षेत्र म्हणून देशभर विख्यात आहे. याशिवाय येथे मोठी औद्योगिक वसाहतही आहे. हजारो कामगार या वसाहतीत काम करतात. या कामगारांच्या सोयीसाठी पुणे ते लोणंद दरम्यान लोकल सेवा मंजूर आहे. येथील कामगारांना एमआयडीसी परिसरातच उतरण्याची सोय झाली तर अधिक सोयीचे होईल. ही गरज लक्षात घेऊन पुणे ते लोणंद या मार्गावर जेजुरी एमआयडीसी परिसरात एक स्टेशन व्हावे, अशी विशेष मागणी सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

‘२ महिन्यात शिंदे- भाजप सरकार पडणार’, दानवेंच्या दाव्याला संजय राऊतांच्या दुजोरा

Latest Posts

Don't Miss