MCA निवडणुकीत पवार-शेलार युतीनंतर पटोले नाराज !

एमसीए (MCA) अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

MCA निवडणुकीत पवार-शेलार युतीनंतर पटोले नाराज !

एमसीए (MCA) अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. हा संशय व्यक्त करताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे अंगुलीनिर्देश केलं आहे.

महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधक हा भाजप असूनही शरद पवारांनी भाजपसोबत युती केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आत्तापर्यंत मौन धरले होते. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर मौन सोडलं असून शरद पवारांच्या या खेळीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्हीही उमेदवार दिला नव्हता त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको असं म्हणत पवारांनी सर्वपक्षीय आवाहन केलं आहे.

मुंबई क्रिकेट असोशिएशनसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. “एमसीए निवडणूक म्हणजे पैशांची निवडणूक, एमसीएमध्ये खूप पैसा आहे. पण सध्या राजकारणात काय चाललंय ते कळत नाही, कुठलातरी वास येतोय असं वाटतंय. इथून मागे चार निवडणुका झाल्या पण त्या बिनविरोध झाल्या नाही. तर यावेळी काय चमत्कार झाला ते कळत नाही, एक नेता दुसऱ्या नेत्याची भेट घेतो आणि युती करतो, त्यामुळे कुठेतरी राजकारणाचा वास येतोय” अशा शब्दांत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

“मला थेट असा आरोप नाही लावायचा, पण एमसीएमध्ये जे काही सुरू आहे, त्यावर मी बोलतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन निवडणूक झाल्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही. एमसीएच्या निवडणुकीनंतरच हा असा चमत्कार का घडतो? एक व्यक्ती भाजपचा मुंबई शहरातला एका नेत्याच्या घरी जातो आणि त्यानंतर असं काही होतं. यामध्ये नक्कीच एमसीए निवडणुकीचा वास आहे.”, असा संशयही नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

Mhada Lottery : म्हाडाच्या लॉटरीसाठी दिवाळीचा मुहूर्त हुकणार !

मोबाईलच्या टॉर्चमध्ये पार पडली शिंदे सरकारच्या ‘या’ मंत्र्याची सर्जरी; एका फटक्यात जनरेटर मंजूर

Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version