Patra chawl case : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, पुढील सुनावणी 22 ऑगस्टला

Patra chawl case : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, पुढील सुनावणी 22 ऑगस्टला

मुंबई : शिवसेना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी राऊतांनी 31 जुलै रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना दोनदा न्यायालयात हजर करण्यात आले. आता पुन्हा एकदा राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजापासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगामध्ये अराऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहेसणार आहे. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे.

पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने 9 विकास कामांना 901 कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने 138 कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या आर्थिक घोटाळया प्रकरणी संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केल्याचे देखील ईडीने दावा केला आहे. त्यातच आज संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामना यात रोखटोक या सदरात लेख लिहिला यावर देखील ईडीने प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे संजय राऊत यांचा अडचणीत भर पडणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Maharashtra Cabinet Expansion : आज मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब

Exit mobile version