spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम पवारसाहेबांनी केले – अजित पवार

महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम पवारसाहेबांनी केले. शिवाय राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिकाही बजावली अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम पवारसाहेबांनी केले. शिवाय राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिकाही बजावली अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांकडे पाहिले गेले आहे. पवारसाहेबांनी दूरदृष्टी ठेवत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने वास्तू उभी करायची कल्पना आणली ती सत्यात उतरवली हेच त्यांच्या कामाचे गमक आहे असेही अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरीवर झाला. तिथले खासदार अमोल कोल्हे आहेत. रायरेश्वरवर शपथ घेतली तो किल्ला भोरमध्ये येतो तिथल्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला तो किल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मतदारसंघात आहे तर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड स्थापन केली ती राजधानी खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदारसंघातच आहे आणि हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे आहेत हेही अजित पवार यांनी सांगितले. आपापसातील मतभेद संपवा… दोन पावले मागे या.. पक्ष एक नंबरवर न्यायचा असेल तर मागेपुढे हे घ्यावेच लागेल असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांचे बोट धरुन राजकारणात पुढे आल्याचे सांगतात त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे मात्र त्यांच्या मनात पवारसाहेबांबद्दल असलेले स्थान लक्षात घेतले पाहिजे हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे पवारसाहेबांच्या विचाराचे लोक निवडून कसे येतील असा निश्चय करुया असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

हे ही वाचा : 

चंद्रकांत पाटलांचा मोठा निर्णय, कारवाया मागे घेण्याच्या दिल्या सूचना

Pune Rickshaw Driver Protest पुण्यात रिक्षा आंदोलकांचा उद्रेक! रिक्षा सोडून चालक निघाले घरी

Instagram Reel कशी डाउनलोड करायची ? जाणून घ्या सोपी पद्धत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss