spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत टीव्हीवर आले की लोकं चॅनेल बदलतात – शंभूराज देसाई

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टाकेनंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)  यांनी राऊतांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिल आहे. साताऱ्यात शंभूराज देसाईंनी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टाकेनंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)  यांनी राऊतांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिल आहे. साताऱ्यात शंभूराज देसाईंनी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. “मीडियाने संजय राऊतांना टीव्हीवर दाखवण कमी करा, संजय राऊत सकाळी टिव्हीवर आले की लोक चॅनल बदलतात याचा सर्व्हे करा.” असं म्हणत शंभूराज देसाईंनी संजय राऊत यांच्या रोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर शंभूराज देसाई बोलताना ते म्हणाले की, मीडियाने संजय राऊतांना टीव्हीवर दाखवण कमी करा. संजय राऊत सकाळी टिव्हीवर आले की लोक चॅनल बदलतात याचा सर्व्हे करा. जिल्ह्यात अशी नियंत्रण व्यवस्था होत असेल तर मी याचे सॅम्पल करून दाखवतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपलब्ध निधी १०० रुपयांचा असायचा आणि मंजुऱ्या १००० रुपयांच्या असायच्या याउलट या सरकारच्या काळात आमच्याकडे असणारे उत्पन्न, वर्षातून येणारा निधी त्यासाठी लागणारी तरतूद करण्यात आल्याचेही शंभूराज देसाई म्हणाले. उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीत गेल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच झालाच. तुम्ही त्यांचे वारसदार असाल पण बाळासाहेब ठाकरे यांना कुटुंबापुरतं मर्यादित आणि संकुचित ठेवू नका. जे आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे कोणाकडे खोके गेले कोणाकडे फ्रिज गेले हे कळेल असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा : 

IPL2023, चेन्नई आणि गुजरातची ताकत वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल राहुल गांधींना जमीन मंजूर, पुढील सुनावणी ३ मे रोजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss