Monday, September 30, 2024

Latest Posts

शिंदेंच्या भाषणातून लोक निघून गेली मग स्वत:हून ती कशी आली?; अजित पवारांचा सवाल

दसरा मेळावा होऊन दोन ते तीन दिवस उलट ले आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात अजून हि मुद्दा जोरातच आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना तर सत्ताधारी विरोधकांना टीका करण्याची संधी सोडत नाही आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथे ग्रामपंचायत उद्घानप्रसंगी कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी चे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अजित पवारांनी अशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

सध्या शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांनवर पैशाचा पाऊस कोसळत आहेत. अजित पवार यांनी शिवसेनेत बंड झलेला इतिहास सुद्धा सांगितला. ज्या ज्या वेळी शिवसेना फुटली. त्यावेळी सगळे आमदार फुटले. पण ते निवडून आले नाहीत. नारायण राणे तर पोट निवडणुकीतही पडले. कोल्हापुरात देखील गद्दार लोकं निघाली आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यावेळी पावसाचे वातावरण बघून अजित पवार म्हणाले की, पाऊस आणि राष्ट्रवादीचा चांगला संबंध आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षाचे विचार वेगळे असले तरी ते मुद्दे बाजूला ठेवून मार्ग काढला होता. कोरोनाच्या काळात एकत्र येऊन काम केले. आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला होता. विकासासाठी जे करता येईल ते सर्व केले. परंतु, सगळंच मला पाहिजे, या भाजपच्या वृत्तीतून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. पण जनतेने दिलेली जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडू. सत्ता येते आणि जाते. अजित पवार सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही असे म्हणत भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

आमचे सरकार असताना आम्ही सर्वांना निधी दिला मात्र भाजप शिंदे सरकारमध्ये केवळ त्यांच्या आमदारांना निधी देत असल्याचा आरोप ही अजित पवार यांनी यावेळी केला आहे सोबतच हे मूठभर लोकांचं राज्य नाही अशा गोष्टी कोण करत असाल तर कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आले नाही एकनाथ शिंदे देखील कायमचे खुर्चीवर बसणार नसून १४५ चा आकडा गेला की तेही सत्तेतून जातील. काय असे एकनाथ शिंदे यांच्या मनात होते की त्यांनी ४० आमदारांना घेवून गेले मात्र सध्या सर्वत्र त्यांना पन्नास खोके एकदम ओक्के बोलले जात आहे, असे म्हणत खोचक टोला ही यावेळी त्यांनी लगावला. अजित पवार यांनी यावेळी दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या भाषणातून लोक निघून गेली मग स्वत:हून ती कशी आली? असा सवाल पवार यांनी केला आहे तसेच शिंदेच्या भाषणातून लोक उठून गेल्याने शिंदेंना भाषण थांबवावे लागले अशी टीका पवार यांनी केली आहे. उलट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला असून ठाकरेनी आवाहन केलेल्या गोष्टींना ही शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला मात्र शिंदे च्या मेळाव्यात लोक उठून जात होती.

हे ही वाचा:

राशी भविष्य ८ ऑक्टोबर २०२२, आज काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागतील

लोकलने प्रवास करणार आहात? तर नक्की वाचा, मध्य रेल्वेने रविवारी…..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss