spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘राष्ट्रवादीबद्दल गॉसिप करायला लोकांना खूप आवडतं’,… सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Nationalist Congress MP Supriya Sule) यांनी आज (मंगळवार) पुण्यातील मतदारसंघातील प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Nationalist Congress MP Supriya Sule) यांनी आज (मंगळवार) पुण्यातील मतदारसंघातील प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा सध्या सुरू असलेला वाद आणि त्यावर सुरू असलेले राजकारणावर देखील प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदेगट यांच्यात दसरा मेळाव्यावरून चाललेल्या वादावर भाष्य केलंय. दसरा मेळाव्यावरून राजकारण दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होतो. तेव्हाही शिवसेनेच्या बाबतीत असं कधीही केलं नाही. शिवसेनेचा भव्य मेळावा व्हायचा. आम्हीही तो उत्सुकतेनं पहायचो. आमच्यावरती काय टिका करतात, याची आम्हाला उत्सुकता असायची, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीबद्दल गॉसिप करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार जयंत पाटील हे दोघे विकास कामात आणि पक्ष संघटनेत खूप व्यस्त आहेत. त्यामुळे ते गॉसिपमध्ये फारसा वेळ घालवत नाही. म्हणूनच पक्षाचा परफॉर्मन्स एवढा चांगला झालाय. आमच्या कुटुंबाबद्दल आणि पक्षाबदल जेवढी आमची चर्चा नसते तेवढी बाहेर असते, एन्जॉय करा असा सल्ला खासदार सुप्रीया सुळे यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी राज्यतील कामकाजावरदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमच्या घरातील, कुटुंबाबद्दल, आमच्या पक्षाबद्दल आम्ही जेवढी चर्चा करीत नाही. तेवढी चर्चा बाहेर सुरू असते. असंही यावेळी त्यांनी सांगितले. याशिवाय शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याचं देखील बोललं जात आहे, यावर त्या म्हणाल्या की, “याबाबत आपण पोलिसांकडून माहिती घ्यावी.”

तसेच विदर्भ दौर्‍यात राज ठाकरे म्हणालेत की, आपल्याला मोठ्या ताकदीविरोधात लढायचं आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आपण संविधान विसरत चाललो आहोत का? देशात आणि राज्यात दडपशाही नाही. त्यामुळे सर्व पक्षांनी दौरे करावेत, आपला विचार मांडावा. ज्याला यश येईल. त्याने मायबाप जनतेची सेवा करावी. त्यामुळे प्रत्येक जण आपला पक्ष वाढविण्यास दौरे करीत असतील. तर त्यामध्ये गैर काय?”

तसेच तुरुंगात असणाऱ्या संजय राऊत, नवाब मलिक आणि नितीन देशमुखांना राष्ट्रवादीने वाऱ्यावर सोडलं या आरोपावर सप्रीया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्यांवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मलिकांसह कुणालाच वाऱ्यावर सोडलं नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. भाजपकडून करण्यात येणारे आरोप चुकीचे असून, नवाब मलिक यांना कधी डावललं नाही. मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. तसेच अजूनही ते आमचे चीफ स्पोक पर्सन असल्याचे त्या म्हणाल्या. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची २४ तास माझा कॉन्टॅक्ट असतो असेही सुप्रीया सुळेंनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Paithan : मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी एका तरुणाने जिवाच्या आकांताने केले प्रयत्न

पत्राचाळ घोटाळ्याप्रकारणी ईडीचा मोठा खुलासा, माजी मुख्यमंत्र्यांचा हात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss