मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल, सरकारी कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल, सरकारी कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी तक्रार

नांदेड, हिंगोली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर ?

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर वातावरणात शिंदे यांची चर्चा होत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या गटाविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची मागणी असलेली याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक ऑगस्टला सुनावणी होणार आहे. हे प्रकरण चालू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणखीन एक याचिका ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील कार्यालयात धार्मिक विधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी शिंदेंच्या विरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर येत्या दिवसात सुनावणी होणार आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर 7 जुलैला मंत्रालयातील कार्यालयात सतनाऱ्याची पूजा केली हे कृत्य राज्यघटनेच्या विरोधात असल्याने अशा कोणत्याही धार्मिक विधी शासकीय कार्यालयात करता येत नाही शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचीही यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : 

मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का

Exit mobile version