spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जुन्या खपल्या काढत, शिंदे गटाने केला आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील प्रकल्पासाठी नियुक्त असलेल्या कंपनीने चेन्नई व इतर राज्यात मुलाखती घेतल्याचे सांगितले होते.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील प्रकल्पासाठी नियुक्त असलेल्या कंपनीने चेन्नई व इतर राज्यात मुलाखती घेतल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्राचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला आज शिंदे गटाच्यावतीने प्रत्युत्तर देण्यात आले.

पश्चिम बंगाल आणि चेन्नईमधून विद्यार्थी जास्त मिळतात. त्यामुळे संबंधित कंपनीने तिथे मुलाखती घेतल्या. कॅबिनेट मंत्री राहूनही माहिती न घेता बोलणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर (Shinde group spokesperson Kiran Pavaskar) यांनी केला. तसेच सुशांतसिंग, (Sushant Singh Rajput) दिशा सालीयन (Disha Salian) केसेस घडल्या तर लोक कसे येतील, असा उलट सवालही त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेणार असल्याचे पावस्कर यांनी सांगितले. यापूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुखांचे विचार लुटण्यासाठी लोक येत असे. आता सोनियांचे विचार राहिले असून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली असल्याची टीका पावस्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कोथळा, वार, घुसून मारणे असे काही सोडले तर उद्धव यांच्याकडे बोलण्यासाठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.

शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीबाबत सरकारने दबाव आणला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्क ही क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेटची खेळपट्टी, मैदान उखडून टाकली तर जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी केला. शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेणार, त्यासाठी कोणता गनिमी कावा वापरणार, याबाबत स्पष्टपणे का सांगत नाही असा सवाल त्यांनी शिवसेना नेत्यांना केला. आमचा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे पावस्कर यांनी म्हटले.

किरण पावस्कर यांनी म्हटले की, ,आदित्य ठाकरे यांनी अप्पो इन्फ्राटेक कंपनीवर आरोप केले. हा सगळा प्रकार कीव येण्यासारखा आहे. संबंधित कंपनीने महाराष्ट्रात दोन वेळेस मुलाखती घेतल्या होत्या. मुंबईत तीन ठिकाणी मुलाखती झालेल्या. तर ९ जागांसाठीच्या मुलाखती राज्याबाहेर झाल्याचे पावस्कर यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले असल्याचा आरोप पावस्कर यांनी केला. कोणी कानात सांगतो तसे उड्या मारणे बंद करा, अशी बोचरी टीकाही पावस्करांनी आदित्य यांच्यावर केली. चित्रपटसृष्टीत सुशांतसिंग, दिशा सालीयन सारखी प्रकरणे घडत असतील तर लोक कशी येतील, असा सवालही त्यांनी केला. एनआयए तपास प्रलंबित आहे. जेव्हा चौकशी होईल त्यावेळी वाझेंचे प्रकरणातील सत्य समोर येईल असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी प्रयत्न केला ? राणेंचा सवाल

रशियन सरकारचा अजब आदेश! १८ – ६५ वयोगटातील पुरुषांना तिकिटविक्री थांबविण्याचे दिले आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss