spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi : ‘जहां झुग्गी वही मकान’ या योजनेअंतर्गत, दिल्लीतील ५०० झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील कालकाजी भागात राहणाऱ्या ५०० लोकांना पक्क्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इन-सिटू स्लम रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत दिल्लीतील कालकाजी येथे ३,०२४ नव्याने बांधलेल्या फ्लॅटचे उद्घाटन केल्यानंतर भूमिहीन शिबिरात पात्र लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द केल्या.

हेही वाचा : 

शार्क टँक इंडिया सीझन २: कारदेखोचे सीईओ अमित जैन यांचे आगमन

पंतप्रधान म्हणाले की, आज शेकडो लाभार्थ्यांना घराच्या चाव्या मिळत आहेत. कालकाजी विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३००० घरे तयार आहेत. गेल्या सात दशकात आपली शहरे विकासापासून दूर राहिली. शहरात भेदभाव आणि विषमता आहे. आज देश ‘सबका साथ’ विकास या मंत्रावर चालत आहे. आज देशात गरिबांचे सरकार आहे, आज गरीब केंद्रबिंदू आहेत. दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब घटकातील लोकांना आज ‘जहां झुग्गी वही मकान’ अंतर्गत त्यांचे फ्लॅट दिले जात आहेत. दिल्लीतील कालकाजीमध्ये ३,०२४ फ्लॅट बांधण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज सुमारे ५०० जणांना फ्लॅटच्या चाव्या दिल्या जात आहेत. नागरी विकास मंत्रालयाच्या ‘इन-सिटू स्लम रिहॅबिलिटेशन’ प्रकल्पांतर्गत हे सदनिका देण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी राजस्थानातील मानगड धाम येथे पोचले. तेथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. ते म्हणाले, की, १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापूर्वी आदिवासी समुदायाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते.

पुण्यात युवासेनेची नवीन बांधणी; नव्या नियुक्त्या जाहीर

व्यासपीठावर राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, की मुख्यमंत्री या नात्याने आम्ही सोबत काम केले आहे. अशोक गेहलोत हे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्यापैकी सर्वांत वरिष्ठ आहेत.

IND vs BAN T20 WC: पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरु, कमी ओव्हर्स मध्ये बांग्लादेशला विजयासाठी नवीन टार्गेट

Latest Posts

Don't Miss