पीएम मोदींनी रोजगार मेळाव्यात ७१ हजार हून अधिक जणांना नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचे केले वाटप

पीएम मोदींनी रोजगार मेळाव्यात ७१ हजार हून अधिक जणांना नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचे केले वाटप

सरकारी नोकऱ्यांमधील भरतीसाठी मोदी सरकारच्या मेगा योजनेचा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. रोजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी ७५ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले होते, तर आज २२ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात इतर ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

हेही वाचा : 

शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार: नाना पटोले

रोजगार मेळाव्या अंतर्गत केंद्र सरकारमध्ये देशभरातील जवळपास दहा लाख युवकांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून वाटप करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रांमध्ये यूपीएससी, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे. यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी ७५ हजार युवकांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली होती. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात जवळपास ७१ हजार हून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. युवकांना नियुक्ती पत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

देशभरातील ४५ ठिकाणी (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता) तरुणांना त्यांच्या नियुक्ती पत्रांच्या भौतिक प्रती दिल्या जातील. शिक्षक, लेक्चरर, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे देखील भरली जात आहेत. विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) गृह मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात पदे भरली जात आहेत.

प्रेक्षकांच्या मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी बॉलीवूडमध्ये कार्तिक आर्यन सर्वोच्च स्थानावर; पहा काय आहे कारण

विरोधकांवर निशाणा

यावेळी केंद्रीय मंत्री जितेंज्र सिंह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. युवकांना रोजगार दिल्याबद्दल पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले पाहिजेत. दहा लाख युवकांना रोजगार देण्याचा शब्द पाळत पंतप्रधान मोदी यांनी आतपर्यंत दोन टप्प्यात जवळपास दीड लाख युवकांना रोजगार दिला आहे. आज ज्यांना नियुक्ती पत्र मिळाले आहे त्यातील अनेक जण विरोधी पक्षातील कुटुंबामधील तरूण आहेत. आता हे लोक काम करणार नाहीत का? असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केलाय.

Measles Outbreak : मुंबई, ठाण्यानंतर भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा मोठ्या प्रमाणात शिरकाव; राज्य सरकारकडून तातडीची बैठक

Exit mobile version