PM Modi Pune Visit – लोकमान्य टिळक पुरस्काराने नरेंद्र मोदींना पुण्यामध्ये सन्मानित

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुण्यामध्ये सन्मानित करण्यात आला.

PM Modi Pune Visit – लोकमान्य टिळक पुरस्काराने नरेंद्र मोदींना पुण्यामध्ये सन्मानित

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुण्यामध्ये सन्मानित करण्यात आला. आजचा हा पुरस्कार दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला.

आज लोकमान्य टिळक पुरस्कार पुण्यामध्ये पार पडला. लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक, प्रतिमा आणि १ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचा स्वरूप आहे. १ लाखांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार ‘नमामी गंगे’ या गंगा नदी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी देण्यात येण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची या पुरस्कारासाठी का निवड करण्यात याबाबत सांगताना दीपक टिळक म्हणाले की, “लोकमान्यांनी यावेळी सर्व विश्वस्त चर्चेसाठी एकत्र आले तर आमच्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक, बलाढ्य हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं होतं असे दीपक टिळक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला पुरस्कार रक्कम ‘नमामी गंगे योजने’साठी दिले आहेत. राष्ट्रीयत्व, हिंदुस्तानची पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितलं होतं. तेच सूत्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्राच्या मागे आहे. त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण हे त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे,” असं दीपक टिळक यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

ODI मालिकेला आजपासून सुरुवात, पहिला सामना भारतासाठी लकी की अनलकी

उद्धव ठाकरेंनी केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

नागपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version