spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी PM Modi यांनी मानले काँग्रेसचे आभार!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिकेच्या (America) चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिकेच्या (America) चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बायडन (Jill Biden) यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला रवाना होत आहेत. अमेरिकेचा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करून स्वागत केल्याबद्दल अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचे आभार मानले आहेत.

 पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये ते म्हणाले आहेत की, “माझ्या आगामी यूएस दौऱ्याबद्दल त्यांनी जो उत्साह दाखवला त्याबद्दल मी काँग्रेसचे सदस्य, विचारवंत आणि इतरांचे आभार मानतो, असं सांगून ते म्हणाले की, असा उत्साह भारत-अमेरिका संबंधांची सखोलता दर्शवतो.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिनांक २० जून सांगितले की, यूएस काँग्रेसच्या सदस्यांसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या आगामी यूएस दौऱ्यासाठी उत्साह दाखवत आहेत आणि असा पाठिंबा भारत-अमेरिका संबंधांची सखोलता दर्शवितो. मोदींनी यूएसमधील भारतीय दूतावासाच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केले, ज्यात यूएस काँग्रेसचे सदस्य, व्यावसायिक नेते, भारतीय-अमेरिकन आणि इतर अनेकांचे व्हिडिओ आहेत. यामध्ये ते पंतप्रधानांच्या दौऱ्यावर येण्याची तयारी करत आहेत.

२१ जूनपासून सुरू होणार्‍या अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील आणि न्यूयॉर्कमधील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधानांनी यापूर्वी २०१६ मध्ये अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते.

हे ही वाचा:

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss