spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार, २० सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर असून वर्धा येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. “काँग्रेसने केवळ भ्रष्टाचार वाढवला आहे, देशातील सर्वात भ्रष्ट पार्टीचे कुटुंब म्हणजे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे,” अशी टीका केली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधानांवर निशाणा साधत निशाणा साधत नाना पटोले म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, देशातील सर्व भ्रष्टाचारी नरेंद्र मोदींनी भाजपात घेतले आहेत, त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काही एक अधिकार नाही.” नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेस व गांधी कटुंबावर नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, देशातील सर्व भ्रष्टाचारी नरेंद्र मोदींनी भाजपात घेतले आहेत, त्यांना भ्रष्टाचारावार बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मविआ काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हे सर्व भ्रष्टाचारी चक्की पिसिंग करताना करतील. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा खोटा आहे. माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान चा नारा दिला होता पण पंतप्रधान मोदींनी जवान व किसान दोघांना बरबाद केले आहे. गांधी कुटुंबावर बोलण्याचा तर नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा काही अधिकार नाही,” असे ते म्हणाले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे खोटे बोलणारी मशिन असून महात्मा गांधी यांच्या तपोभूमीतूनही ते खोटे बोलले. महाराष्ट्राला प्रकल्प दिल्याचे भासवले जाते पण दिल्लीतील गुजरात लॉबी महाराष्ट्र कमजोर करत आहेत. नागपूरातील १८ हजार कोटींचा सोलर प्रकल्पही गुजरातला गेला आहे. पण तो प्रकल्प गुजरातला गेला नाही असे उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे सांगत आहेत. केंद्रातील गुजरात लॉबीच्या आदेशाने महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातला पळवले जात असून महाराष्ट्रात बेरोजगारी वाढवली जात आहे, त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे, भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. वेदांता फॉक्सकॉनचा सेमिकंडकर चीप प्रजोक्ट गुजरातला पळवल्यानंतर महाराष्ट्राला त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे सत्ताधारी सांगत होते त्याचे काय झाले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss