spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार

उद्या दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गॅलरीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते क्रांती दालनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत.
राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत उद्या दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गॅलरीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी भारतरत्न स्वरकोकिला मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र दिसले होते. लतादीदींच्या अंत्यसंस्कारानंतरही पीएम मोदी महाराष्ट्रात आले पण मुख्यमंत्री एकतर त्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत किंवा ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पीएम मोदींनी स्वतंत्रपणे पुणे मेट्रोचे उद्घाटन केले आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या दोन नवीन मार्गांचे स्वतंत्रपणे उद्घाटन केले.

Latest Posts

Don't Miss