PM Narendra Modi १० वर्षांपासून ‘भीतीचे राज्य’ चालवत आहेत: Rahul Gandhi

PM Narendra Modi १० वर्षांपासून ‘भीतीचे राज्य’ चालवत आहेत: Rahul Gandhi

लोकसभेत आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर (RSS) जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या टीकेनंतर सभागृहात एकाच गोंधळ उडाला. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी पुन्हा आपल्या ‘X” अकाऊंटवरून “नरेंद्र मोदी १० वर्षांपासून ‘भीतीचे राज्य’ चालवत आहेत!” अश्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (सोमवार, १ जुलै) लोकसभेत भाषण देत भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी पुन्हा आपल्या ‘X” अकाऊंटवरून टीका करत ते म्हणाले, “नरेंद्र मोदी १० वर्षांपासून ‘भीतीचे राज’ चालवत आहेत! सर्व एजन्सी, संस्था आणि प्रसारमाध्यमे ताब्यात घेऊन भाजपने समाजातील प्रत्येक घटकात केवळ भीती पसरवली आहे.”

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना काळ्या कायद्याची भीती वाटते… विद्यार्थ्यांना पेपर फुटण्याची भीती… तरुणांना बेरोजगारीची भीती… छोट्या व्यापाऱ्यांना चुकीचा जीएसटी, नोटाबंदी आणि छापे यांची भीती… देशभक्तांना अग्निवीरसारख्या योजनांची भीती वाटते… मणिपूरच्या लोकांना गृहयुद्धाची भीती वाटते..”

“त्यामुळेच देशातील जनतेने ‘भयीच्या पॅकेज’ विरोधात जनादेश देऊन भाजपकडून बहुमत हिसकावून घेतले आहे. धमकावणे आणि भीती पसरवणे हे भारताच्या आत्म्याविरुद्ध आहे. आपले सर्व धर्मही हेच शिकवतात – घाबरू नका, घाबरू नका. विरोधी पक्षनेता या नात्याने, माझ्या वैयक्तिक आकांक्षा आणि विचारांपुढे भारताचा एकजूट आवाज सभागृहासमोर मांडणे ही माझी जबाबदारी आहे. आणि सरकारकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी विरोधी पक्षाला शत्रू न मानता मित्रपक्ष मानून देशहितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे. जय हिंद!”

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version