spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendr Modi Mumbai Visit Live, डबल इंजिन सरकारमध्ये आता देशाचा विकास होतो, नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केल. मुख्य म्हणजे या सभेत मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. आज मुंबईच्या विकास कामांशी संबंधित ४० हजार कोटींच्या विकासकामांचा उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं आहे. भारत माता की जय असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांस सुरवात केली. मुंबईतील माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाला मराठीत सुरवात केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनेक विकास कामाचं उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली आहे आणि ते म्हणाले, मुंबईच्या विकासकामाला गती मिळणार आहे. याआधी गरिबीची चर्चा, जगाकडून मदत मागणं यावर सर्व वेळ घालवला आहे. तसेच ते पुढे म्हणले एकनाथ शिंदे यांनी जो दावोसचा अनुभव सांगितलं तेच वातावरण आता जगात आहे. संपूर्ण जगभर भारताबाबत पॉसिटीव्हिटी आहे. या डबल इंजिन सरकारमध्ये आता आपल्या देशाचा विकास होतो आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहे. मुंबईच्या विकासाठी पैशाची कमी नाही असं देखील यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले आहात. यावीली बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागल्याचं पंतप्रधान म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले की, आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास मुंबईचा विकास अधिक वेगान होईल. मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी. यावेळी त्यांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थासाठी अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले गेले. देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागल्याचं पंतप्रधान म्हणाले. सर्वसमान्यांना चांगल्या सुविधा देणं हेच आमचं लक्ष असल्याचे ते म्हणाले. जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था खराब आहे, पण देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामे सुरु आहेत. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग आल्याचे मोदी म्हणाले.

तसेच भाषणाच्या वेळी नरेनफ्द्र्र मोदी यांनी मुंबईकरांना साद घातली आहे. ते म्हणाले आहेत की, दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवं आहे. फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, तुम्ही एक पाऊल पुढे या मी ११ पावले येण्यास तयार आहे. असं देखील मोदी म्हणले आहेत. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की स्वनिधी योजना याचं एक उदाहरण आहे. शहरातील अर्थव्यवस्थेचा भाग असलेले रेडीवाले आणि छोटे दुकानदार त्यांच्यासाठी योजना सुरु केली. या छोट्या व्यापाऱ्यांसाठी बँकाकडून स्वस्त आणि विना गॅरंटी कर्ज देण्यात आलं. ३५ लाखा व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला आहे. हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. दिल्ली-महाराष्ट्र-मुंबई भाजपची सत्ता असायाल हवी असं सूचक विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं.मुंबईच्या विकासासाठी शहरात समर्पित प्रशासन असेल तर विकास वेगानं होतो, एकत्रित मिळून मुंबईचा विकास करु, असे मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

PM Modi Mumbai Visit Live, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

बी. के.सी मैदानातून एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss