PM Narendr Modi Mumbai Visit Live, मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतःचे खिशे भरले, देवेंद्र फडणवीस

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल.

PM Narendr Modi Mumbai Visit Live, मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतःचे खिशे भरले, देवेंद्र फडणवीस

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन देखील होणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी (BKC Ground) मैदानावर एका विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या सभेत मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो. सर्व नागरिकांचं स्वागत करतो. महाराष्ट्र आणि मुंबईच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक प्रेम मुंबईकरांनी दिलंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधायला सुरुवात केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणांस सुरवात केली. तसेच यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यासाठी १ लाख कोटींचे उद्योग आणले आहेत. राज्यातील डबल इंजिनचा वेगवान सरकार आहे असा उल्लेख यावेळी केला आहे. तर त्यांनी गद्दारी करत सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २० वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केलं आहे त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली आहे आणि स्वतःची खिशे भरली आहेत.

सत्तांतरानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अवघ्या काही क्षणात नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी ३८,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसेच मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग 2A आणि 7 चे उद्घाटन देखील करतील. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी करणार आहेत. त्याच सोबत 20 व्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दवाखान्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

PM Modi Mumbai Visit Live, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

बी. के.सी मैदानातून एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version