राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपींग’ प्रकरणात पोलीस आयुक्तांच्या विरोधात ‘क्‍लोजर रिपोर्ट’ दाखल

राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपींग’ प्रकरणात पोलीस आयुक्तांच्या विरोधात ‘क्‍लोजर रिपोर्ट’ दाखल

तत्कालीन महाविकास आघाडीची राज्यामध्ये सत्ता असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची “अमजद खान’, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू “समशेर बहाद्दुर शेख’ यांच्यासह माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांनाही विविध प्रकारची नावे देत त्यांचे फोन टॅपींग केले, तसेच त्या फोनमधील संभाषण भाजप सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्‍ला यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : 

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मुदत वाढ, आयोगाचं उद्धव ठाकरेंना पत्र

याप्रकरणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांची उच्चस्तरीय समितीला सांगण्यात आले होते. याप्रकरणी आता तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये “क्‍लोजर रिपोर्ट’ दाखल करण्यात आला आहे. त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

Ind vs Pak Women- पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी केला पराभव

फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालविण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर केला होता. पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला तर रश्मी शुक्लांवरील केस बंद होणार आहे.

धनुष्यबाण निश्चितपणे आम्हालाच मिळेल ; रामदास कदम

Exit mobile version