किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी काल (२८ नोव्हेंबर) चौकशी केली. तसेच आज (शनिवारी) पुन्हा चौकशीला बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत आता वाढ निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घणाघात, ”सरकारमध्ये ताळमेळ नाही, उद्योगमंत्र्यांकडून राज्यातील जनतेची दिशाभूल”

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितलं, यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

त्याच्याच जबाबात पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याची माहिती समोर येत आहे. दाखल गुन्ह्यात आरोपींमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. सध्या याच प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्यांना चौकशीला बोलाविण्यात आले होते. त्यानुसार, चौकशी करत पुन्हा काही कागदपत्रांसह आज पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे.

हिवाळ्यात या गोष्टी केल्याने आजारपण होईल दूर

किरीट सोमय्या यांनी काल सकाळीच यासंदर्भात एक ट्वीटही केलं होतं. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये सहा गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की त्यांनी सदनिकांचा ताबा घ्यावा, असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊनही किशोरी पेडणेकरांवर आरोप केले आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?

मुंबईत झोपपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत राबवलेल्या प्रकल्पात सदनिका मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत पैसे घेतल्याची तक्रार ९ फिर्यायदिनी पोलिसात केली. ९ जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही हिस्सा किशोरी पेडणेकर यांच्याकडेही गेल्याचा दावा अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत केल्याची माहिती मिळत आहे. परिणामी २८ ऑक्टोबरला पहिल्यांदा त्यांची पोलिसांकडून बोलावून चौकशी करण्यात आली. आता आज पुन्हा किशोरी पेडणेकर यांची परत चौकशी दादर पोलिसांकडून करण्यात येणार आहे .याप्रकरणी आता किशोर पेडणेकर कायदेशीर सल्ला घेतला आहे.

Exit mobile version