Sunday, July 7, 2024

Latest Posts

Nitin Gadkari यांची राजकीय कारकीर्द

आज मंत्रिमंडळाच्या सत्तास्थापने बाबतचा शपथविधी सोहळा (OATH TAKING CEREMONY)  पार पडत आहे. याचेच औचित्य साधून आज, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची राजकीय कारकीर्द कशी सुरु झाली त्यांनी विविध मंत्रीपदे याआधी भूषवली आहेत. याच राजकीय जेष्ठ नेतृत्वाचा व्यक्तिवेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. आजच्या या सोहळ्यात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या नंतर राजनाथ सिंह (Rajnath Singh) मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याच पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर अमित शहा (Amit Shaha) यांनी आणि चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी यांनी शपथ ग्रहण केली. नितीन गडकरींची सविस्तर राजकीय कारकीर्द पुढील प्रमाणे आहे.

नितीन जयराम गडकरी. यांचा जन्म २७ मी १९५६ रोजी झाला. ते एक यशस्वी उद्योजक आहेत. यांची राजकीय कारकीर्द ही भारतीय जनता पक्ष (BJP) या पक्षापासून सुरु झाली. ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६ व्या लोकसभेत (Loksabha) खासदार हा पदभार त्यांनी सांभाळला. ते नागपूर (Nagpur) लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ इतक्या मतांनी निवडून आले होते. ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) आहेत. त्यांनी २६ मे २०१४ रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. तर कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

नितीन गडकरी यांनी भूषवलेली काही महत्वपूर्ण पदे पुढील प्रमाणे –

१. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते माजी मंत्री राहीले आहेत.
२. नागपूर महाराष्ट्र शासनाचे ते पालकमंत्री होते. 
३. पूर्ती ग्रुपचे त्यांनी चेअरमन पद भूषवले आहे.
४. भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष होते.
५. महाराष्ट्र विधान परिषदे मध्ये ते माजी विरोधी पक्ष नेते होते.
६. पदवीधर मतदार संघाचे ते माजी सदस्य (आमदार ) होते.
७. हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशनचे ते माजी सदस्य होते.
८. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळचे ते माजीअध्यक्ष होते.
९. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे ते अध्यक्ष आहेत.
१०. भारतीय जनता पक्षाचे राज्यध्यक्ष पद त्यांनी भूषवले.
११. भारतीय जनता पार्टीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते.
१२ आज ९ जून २०१४ रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट; सत्तास्थापनेचं दिलं आमंत्रण

वरिष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून सुचवावे..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss