महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली – आंनद परांजपे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आंनद परांजपे यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली आहे. परांजपे यांनी ट्विटरवर ट्विट शेयर करत सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली – आंनद परांजपे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आंनद परांजपे यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली आहे. परांजपे यांनी ट्विटरवर ट्विट शेयर करत सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली आहे. ३ वर्षांपूर्वी झालेल्या एका धक्काबुक्की प्रकरणात की, ज्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड स्वत: आरोपी आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणी कलम ३२४ अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास करा असे आदेश दिले आहेत.

परंतु, पोलीस पुढील तपास न करता जितेंद्र आव्हाडांना कसे गुंतवता येईल यासाठी मागचाच तपास पुन्हा करीत आहेत. आणि आतातर मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. काही आरोपींना ५ खोके ऑफर करण्यात आले आहेत की, तुम्ही मा. न्यायालयामध्ये जितेंद्र आव्हाड मारत होते असे सांगा. त्यांना एक जुना व्हिडीओ दाखवला जातो आणि त्या व्हिडीओमध्ये पोलीसच दाखवतात की, ‘हा बघा जितेंद्र आव्हाड’ आणि सांगतात ‘हा आहे ना’ मग तुम्ही लिहून द्या की, जितेंद्र आव्हाड होते. वास्तविक त्या व्हिडीओमध्ये काहीच दिसत नाही.

पोलीस देखिल ह्या प्रकरणातील आरोपींना खोटं-नाटं सांगत आहेत. तुम्हांला १५ वर्षे सजा होईल, जन्मठेप लागेल. तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा ! पोलीसांना ह्या गुन्ह्यात इतका इंटरेस्ट का ? गुन्हा तर फक्त कलम ३२४ चा आहे. कारण, सिवील हॉस्पिटलने दिलेले सर्टिफिकेट हे सिम्पल इंजूरीचे आहे.

मग ऐका… ह्यामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे आणि आम्हांला हे का कराव लागतयं ? याची माहिती नकळत पोलीस कर्मचा-यांच्या तोंडातून निघाली. तेव्हा आपल्यालाही कळेल की, ह्यामध्ये इंटरेस्ट कोणाला आहे आणि कोण कोणावर दबाव टाकत आहे. असं म्हणतं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा : 

उद्ध्वस्त झालेल्या आदिवासी कुटुबांची घरे तात्काळ उभी करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

उद्धव ठाकरे यांची PC LIVE

कंगना रनौत लग्नबंधनात अडकणार का? कंगनाच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version