spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

POLITICS: स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा, CHHAGAN BHUJBAL यांच्याकडून AJIT PAWAR यांचे कौतुक

भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी.

मंत्री छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांचे आभार मनात एक पोस्ट शेयर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले वाडा (MAHATMA PHULE WADA) व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी पोस्टद्वारे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. पुण्यात राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा (BHIDEWADA) तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. यावेळी स्मारक विस्ताराबाबत सादारीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

या बैठकीत अजित पवार यांनी स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्याच्या, तसेच स्मारक विस्तारासाठी जागा संपादन व नागरिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी. भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा अंतर्भाव असावा, अशा सूचना करतानाच जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याची गरज असून लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरूप निश्चित करता येईल. तसेच स्मारकासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याचे महत्व असल्याने याठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा, इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. तसेच इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी, मुलींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा, मराठी आणि इंग्रजीतील आदर्श शिक्षकांची समितीकडून शाळेतील शिक्षणावर लक्ष, परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. तसेच, या वास्तूचे ‘सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा’ असे नामकरण करण्यात यावे आणि महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मांडल्या. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss