spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

POLITICS: BJP ला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र या, PRAKASH AMBEDKAR यांचे आवाहन

कुठल्याही परिस्थितीत सहा डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. चार राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर ते घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण (OBC RESERVATION) टार्गेट केले जात आहे.

येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी बॅलेट पेपरची मागणी केली पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (VANCHIT BAHUJAN AGHADI) नेते प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDAKR) यांनी केले आहे. नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI) हे देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर आहेत त्यांना ओळखलं पाहिजे, भाजपला (BJP) रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीतील मिरज येथे मांडले.

ईव्हीएमबाबत चौकशी बंद करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. खरोखरच त्या मशीनमध्ये बिघाड आहे. ४३१ उमेदवार असतील तर बॅलेट वर मतदान घ्यावे लागते, त्यामुळे ४३१ उमेदवार उभे राहिले पाहिजे. या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरची लोकांनी मागणी केली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर आहेत. त्यांना ओळखणं गरजेचे आहे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हा आपल्याच हातात आहे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाशी चर्चा करून त्यांची मते ही जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मिरासाहेब दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. भाजप सरकारकडून भीती दाखवली जाते. निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम दंगल होते की काय हे सांगता येणार नाही. ओबीसी (OBC) विरुद्ध मराठा (MARATHA) असे भांडण सुरू झाले आहे. धनगर विरुद्ध आदिवासी भांडण यांनी लावले आहे. ईव्हीएम (EVM) मशीनवर निवडणुका न करता बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका होण्यासाठी त्यांनी विविध पर्याय सांगितले. जनतेत जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर शासनाला पर्याय उरणार नाही, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. राज्यात अनेक ठिकाणी दंगल ग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत सहा डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. चार राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर ते घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण (OBC RESERVATION) टार्गेट केले जात आहे. समाजात अशांतता पसरवली जात आहे. आंदोलनाशी संबंधित नसलेल्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे ओबीसींनी सतर्क रहावे, असे असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

आमची बांधिलकी लोकांशी आहे ती आम्ही ठेऊ – अजित पवार

ENTERTAINMENT: लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार ‘अवतार ३’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss