POLITICS: देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार, MANOJ JARANGE यांचा इशारा

POLITICS: देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार, MANOJ JARANGE यांचा इशारा

मराठा समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde)  विश्वास असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)   म्हणाले आहेत. आज लातूर (Latur)  आणि धाराशिव (Dharashiv)  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  मनोज जरांगे लातूरमध्ये दाखल होताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (DEVENDRA FADANVIS)  निशाणा साधला आहे. तर कामातून गेलेला माणूस लवकरच गोळ्या सुरु कराव्यात, असे म्हणत जरांगेंनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला आहे.

छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलेल्या टीकेवर देखील जरांगे यांनी उत्तर दिले आहे. कामातून गेलेला माणूस असून लवकरच गोळ्या सुरु कराव्यात. शहाणा माणूस असता, तर उत्तर दिलं असतं, असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. काही ठिकाणी सभा तर काही ठिकाणी बैठका घेणार आहेत. दुपारी औसा तालुक्यातील किल्लारी (KILLARI) येथे सभा होणार आहे. ही सभा झाल्यानंतर जरांगे पाटील धाराशिव (DHARASHIV) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. ११ डिसेंबर रोजी पुन्हा लातूर (LATUR) जिल्ह्यात मुरुड येथे त्यांची महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार आहे. मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचा एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) साहेबांवर विश्वास आहे. जे अधिकारी जाणून-बुजून नोंदी सापडू देत नसतील ते कामापासून दूर होणार आहेत. कितीही ढोल वाजवत बसलात तरी आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. चौकाचौकात ५० हजार लोक जमत आहेत. जरा विचार करा, हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी (DEVENDRA FADANVIS) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. फडणवीसांनी आता स्वत:च्या माणसांना बोलायला सांगितलं आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहे, असे देखील जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version