POLITICS: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका- CHHAGAN BHUJBAL

POLITICS: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका- CHHAGAN BHUJBAL

chhagan bhujbal

पुणे जिल्ह्यातील (PUNE DISTRICT) इंदापूर (INDAPUR) तालुक्यात छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मनोज जरांगे-पाटील (MANOJ JARANGE PATIL) यांच्यावर टीका केली. तसेच, मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचं ताबडतोब थांबवा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यांनी इंदापूर येथील सभेत केली. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणताही मागणी नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये काय अडचण आहे? बिहार जनगणना करू शकते तर तुम्ही का जनगणना करत नाही? मराठ्यांना कुणबी सर्तीफिकेट द्यायचे सुरु आहे ते थांबले पाहिजे. न्यायमूर्ती शिंदे प्रत्येक ठिकाणी जात आहेत, आणि आवश्यक गोष्टी करून घेत आहेत. आमच्यातील २७ टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. हे जर कोणाला ऐकू गेलं नाही, आपल्याला न्याय मिळाला नाही, तर गोपीचंद पडळकर म्हटले तसं ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है..असचं करावे लागेल, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

मराठ्यांकडे २० टक्के , आमच्याकडे ८० टक्के मतं आहेत. ओबीसी समाजाला (OBC Reservation) २७ टक्के आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रॅकेट आहे. ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त ९ टक्के मिळाल्या. आधी २७ टक्के जागा भरा मग इतर गोष्टी करा, असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarane Patil) यांच्यावर टीका केली. इंदापूर (Indapur) येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांच्यावर सडकून टीका केली. विचार करणारा मराठा समाज गप्प का ? मराठा समाजाच्या मतांसाठी गप्प आहात का? मतं त्यांची आहेत, मग आमची नाहीत का? त्यांची लेकरं आहेत, मग आमची नाहीत का? असा सवाल यावेळी भुजबळांनी उपस्थित केला. आरक्षण हा गरिबी हटावण्याचा कार्यक्रम नाही, असे भुजबळ म्हणाले. याशिवाय, प्रत्येकाच्या संयमाला अंत असतो, संयम संपला तर रागाला कोणी आवर घालू शकणार नाही. असेही या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.  

हे ही वाचा:

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर

Christmas 2023, यंदाच्या ख्रिसमस पार्टीसाठी करा हटके मेकअप…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version