spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Politics: राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांमुळेच वाढला, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

राज्यात कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल की खरी राष्ट्रवादी शरद पवार यांचीच आहे. माझं आंदोलन शरद पवारसाहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलोच नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कर्जत (KARJAT) येथे अजित पवार गटाकडून (AJIT PAWAR GROUP) २ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक नेत्यांनी आपली मतं मांडली. त्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांनीसुद्धा निवडणूक (ELECTION) आणि राजकीय वर्तुळातील गोष्टींविषयी भाष्य केले. त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड (JITENDRA AWHAD) यांनी वक्तव्य केले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आणि त्यातून अजित पवारांवर टीकास्त्र उगारले आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट:

दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी ! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पावर साहेबांनी दिला, त्याच पालन पोषण ही पवार साहेबांनी केल, त्याच संगोपन पुढे पवार साहेबांनीच केल. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखील पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जस आपण म्हटलात तस घ्याना आणि एक नविन पक्ष काढा, नविन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा.

ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता?

तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार (Sharad Pawar) हेच आहेत, हे अख्या जगाला माहित आहे. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार (Ajit Pawar) इतके मोठे नाहीत असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते. मी कोणाला विचारुन आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. राज्यात कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल की खरी राष्ट्रवादी शरद पवार यांचीच आहे. माझं आंदोलन शरद पवारसाहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलोच नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

LIFESTYLE: थंडीत आवळ्याचे सेवन करा, आणि सुदृढ राहा

MUMBAI: गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss