spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

POLITICS: पिक्चर अभी बाकी है..संजय राऊतांकडून कसिनोतील VIDEO ट्वीट

संजू भाऊचा सकाळी ९ वाजताच्या भोंग्यापूर्वीचा ‘ब्रँड’ तर संपूर्ण महाराष्ट्राला आता कळून चुकला आहे. पण, आज दुपारच्या वायफळ बडबडीपूर्वीचा ब्रँड आता शोधूनच काढावा लागेल. बंदा ये कौनसा नशा करता है…?

संजय राऊत यांच्याकडून कसिनोतील व्हीडीओ ट्वीट करण्यात आला आहे. तसेच, An Evening in Macau.. मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है..असा आशय त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण:

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांआधी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील एक फोटो केला होता. त्यामध्ये बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता. त्यावर बावनकुळे यांनी  प्रतिक्रिया दिली होती. व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शेयर केलेल्या व्हीडीओमुळे राजकीय वातावरण तापणार असे दिसून येत आहे.

 

काय होतं संजय राऊत यांचं ट्वीट?

ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!

१९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमधून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. तर त्यावर प्रत्युत्तर देत भाजपने आदित्य ठाकरे यांच्यावर ट्वीटद्वारे आरोप करत हल्लाबोल केला आहे. एका कार्यक्रमातील आदित्य ठाकरे यांचा हातात ग्लास असलेला फोटो त्यांनी पोस्ट केला आहे.

हे आहेत भाजपने केलेले ट्वीट:

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ..आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?

संजू भाऊचा सकाळी ९ वाजताच्या भोंग्यापूर्वीचा ‘ब्रँड’ तर संपूर्ण महाराष्ट्राला आता कळून चुकला आहे. पण, आज दुपारच्या वायफळ बडबडीपूर्वीचा ब्रँड आता शोधूनच काढावा लागेल. बंदा ये कौनसा नशा करता है…?

हे ही वाचा:

MARATHA RESERVATION: आंदोलनामुळे जायकवाडीत पाणी न सोडण्याचे अधीक्षकांचे पत्र

Mumbai: पुन्हा एकदा धमकी, १ मिलियन डॉलर द्या नाहीतर बॉम्बस्फोट करु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss