POLITICS: राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं…

POLITICS: राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं…

आज अटल बिहारी वाजपेयी (ATAL BIHARI VAJPEYI) यांची जयंती असून अनेक राजकीय मंडळींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले आहे. तर अनेकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन देशभरात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करून गरीब आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली.

देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एक अशी प्रेरणा आहेत, जिचा प्रभाव देशातील सर्वच राजकीय नेत्यांवर पडला आहे. असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोस्टमार्फत म्हटले आहे. तर मनसे अधिकृत पेजवरून सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पोस्ट करण्यात आली आहे. 

हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं

सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही… पण ही अटलवाणी ऐकलीत तर कळेल की, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज…………… असो. राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना की पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो! असे म्हणत मनसेच्या पेजवरून अटल बिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. 

यासोबतच, अनेक ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

Christmas 2023: ख्रिसमसच्या निमित्ताने लहान मुलांना द्या ‘या’ भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version