POLITICS: दिल्लीत होणार महायुती सरकारची बैठक

आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आमदार अपात्रता सुनावणी १८ दिवस चालणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

POLITICS: दिल्लीत होणार महायुती सरकारची बैठक

पाच राज्यांमधील (ELECTIONS IN 5 STATES) निवडणुकीची (ELECTION) रणधुमाळी समाप्त होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने दिल्लीमध्ये (DELHI) महायुती सरकारची बैठक (MAHAYUTI GOVERNMENT MEETING) पार पडणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (AMIT SHAH) यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सर्वच राजकीय घडामोडींवर तसेच मराठा आरक्षणावर (MARATHA RESERVATION) चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठ्यांचा ओबीसीमध्ये (OBC) समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL) यांनी दिलेली मुदत २४ डिसेंबर (24 DECEMBER) रोजी संपणार आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणावर (MARATHA RESERVATION) चर्चा होईल, याबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे. या बैठकीमध्ये भाजप (BJP), शिंदे (SHINDE)आणि अजित पवार गट (AJIT PAWAR GROUP) निमंत्रित असणार आहेत, तसेच  छोट्या घटक पक्षांना सुद्धा या बैठकीत सामील केले जाईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या बैठकीमध्ये राज्यातील मराठा आरक्षण (MARATHA RESERVATION) त्याचबरोबर ओबीसी आरक्षण (OBC RESERVATION), मंत्रिमंडळ विस्तार त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यांमधील पालकमंत्री वाटपाचा तिढा, महामंडळ वाटप याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी (MAHARASHTRA POLITICAL NEWS) पुन्हा एकदा वेगाने घडू शकतील. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)आणि मंत्री छगन भुजबळ (MINISTER CHHAGAN BHUJBAL) एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे, देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असलेल्या शिवसेना (SHIVSENA) आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आमदार अपात्रता सुनावणी १८ दिवस चालणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

सावनी रविंद्रचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल

अंनिसतर्फे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version