ब्रिटनमध्ये पुन्हा सत्तानाट्य; आता ‘हे’ बनू शतकतात ब्रिटनचे पंतप्रधान

ब्रिटनमध्ये पुन्हा सत्तानाट्य; आता ‘हे’ बनू शतकतात ब्रिटनचे पंतप्रधान

४५ दिवसांपूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची खुर्ची सांभाळणाऱ्या लिज ट्रस यांनी शेवटी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या नव्या सरकारनं एक नवीन आर्थिक योजना सादर केली होती. ती योजना अयशस्वी झाल्यानंतर ब्रिटनच्या राजनीतीत उलथापालथ घडली. कंझरव्हेटिव्ह पार्टीच्या काही नेत्यांनी मागणी केली होती की, ट्रस यांनी आपलं पद सोडून द्यावं. परंतु, राजीनामा देण्याच्या २४ तासांपूर्वी लिज यांनी राजीनामा देणार नसल्याचा दावा केला होता.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आता पुढील आठवड्यात ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक होऊ शकते. लिझ ट्रस यांचा ब्रिटनमधील कार्यकाळ हा आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांच्या तुलनेत सर्वात कमी राहिला आहे. याचदरम्यान ब्रिटनचे विरोधी कामगार नेते केयर स्टारमर यांनी आता सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. यूकेमध्ये जोपर्यंत नवीन पंतप्रधान निवडला जात नाही, तोपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान राहतील. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच केली होती. त्यांच्यावर खूप दबाव होता.

आता नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या सोबतच माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, पेनी मॉर्डेंट, बेन वॉलेस यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या खासदारांमध्ये सुनक हे आजही सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे बोलले जात आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नियमांनुसार, नवीन नेत्याला पंतप्रधान झाल्यानंतर किमान एक वर्ष अधिकृत प्रक्रियेद्वारे आव्हान दिले जाऊ शकत नाही. त्यामुळेच खासदारांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची पत्रे सादर केली आहेत. अशी बरीच पत्रे मिळाल्यास, १९२२ च्या समितीचे नेतृत्व सर ग्रॅहम ब्रॅडी-निवडणूक प्रक्रियेचे नियम बदलू शकतील. ज्यात दोन उमेदवारांची एक शॉर्टलिस्ट तयार केली जाऊ शकते. यानंतर त्यांच्यापैकी एकाला पुढचा पंतप्रधान बनवले जाईल. त्यानंतर पक्षाच्या सदस्यांच्या मदतीशिवाय टोरी खासदार कोण पंतप्रधान आणि कोण उपपंतप्रधान बनणार हे ठरवतील.

हे ही वाचा :

राज्य सरकारचे नवीन धोरण ५ जी तंत्रज्ञानासाठी फायदेशीर

मोठी बातमी! अमोल काळे झाले नवे एम.सी.ए चे अध्यक्ष, शेलार-पवारांच्या पॅनलचा विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version