राज्याचे अधिकार सचिवांकडे : मुख्यमंत्र्यांचे आदेश

३० जून रोजी शिंदे गटाचे मुख्य एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर विरोधी पक्षनेते असणारे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

राज्याचे अधिकार सचिवांकडे : मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई :- ३० जून रोजी शिंदे गटाचे मुख्य एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर विरोधी पक्षनेते असणारे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज तब्बल ३६ दिवस होत आले परंतु अद्यापही मंत्री मंडळाचा विस्तार हा झालेला नाही. हा मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार, अनेक कामे रखडलेली आहेत त्या बाबत काय होणार अशी अनेक प्रश्न सर्वांना पडलेली आहेत.

तब्बल ३६ दिवस उलटून गेले परंतु अद्यापही राज्यात मंत्री मंडळाचा विस्तार हा झालेला नाही. एकीकडे न्यायालयात तारखांवर तारखा पडत आहेत तर दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ नसल्यामुळे अनेक कामे ही रखडलेली आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे त्यांना विश्रांती घेण्यास सांगितली आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी सुरु आहे. ४ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि ५ ऑगस्ट रोजी मंत्री मंडळाचा विस्तार होणार अश्या अनेक चर्चा होत होत्या. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर अद्यापही कोणताही निर्णय हा झाला नाही आणि पुढील सुनावणी ही ८ ऑगस्ट रोजी होणार असे सांगण्यात आले. म्हणजे मंत्री मंडळाचा विस्तार हा देखील ८ ऑगस्ट पर्यंत लांबणीवर जाणार आहे.

मंत्री मंडळाचा विस्तार हा निश्चित होत नसल्यामुळे मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता संबंधित विभागांच्या सचिवांना देण्यात यावे असे आदेश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. म्हणजेच अर्धन्यायिक स्वरुपाची अपीले, पुनर्विलोकन, पुनर्परीक्षण अर्ज, अंतरिम आदेश पारित करणे तातडीच्या प्रकरणाची सुनावणी अशी अनेक कामे ही त्या त्या विभागाच्या मंत्राकडे असतात. तसेच अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास, शिक्षण ही खाते सामान्य नागरिकांशी संबंधित आहेत. आणि यायबाबत अपिलांवर सुनावणी देखील होत असते. गृह, महसूल, नगरविकास या विभागांमध्ये अनेक प्रकारची अपीले प्रलंबित असतात. गेल्या ३५ – ३६ दिवसांपासून त्या संबंधीची प्रक्रिया अडलेली होती.

हे ही वाचा :-

मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरू, जाणून घ्या अपडेट

 

Exit mobile version