मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, Praful Patel यांची ग्वाही

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, Praful Patel यांची ग्वाही

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने धामधूम सुरु आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) जनसंवाद यात्रा ही पुढच्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्याच्या दौरा करणार असून गोंदिया जिल्ह्यासह वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या शहरांमध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा ही जाणार आहे. यावरून आज रविवार, २९ सप्टेंबर) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी नुकतेच आमरण उपोषण केले होते. परंतु राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे त्यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीवारून इशारादेखील दिला. अश्यातच मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी दसरा मेळावा घेणार आहेत. यावरून प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी दसरा मेळावा घेणार आहेत आणि याबाबत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, “सरकारचं मराठा समाजाला आरक्षण देण्या संबंधाने सकारात्मक आहे. महाराष्ट्रातील जनता ही सर्व बाबत प्रेमभाव असणारी जनता आहे. मराठा आरक्षणावर सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्याच्या संबंधाने याबाबत योग्य तो निर्णय महाराष्ट्र सरकार घेईलच परंतु त्याचबरोबर ओबीसी, इतर समाजांच्या आरक्षणावर त्याचा काय परिणाम होईल. याच्या सुद्धा संपूर्ण अभ्यास सरकार करीत आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार आरक्षण देण्यासंबंधी महाराष्ट्र सरकार काम करीत आहे”

निवडणूक चिन्हांवरून प्रफुल पटेल यांचे मोठे वक्तव्य

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने नवीन चिन्हासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. याबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळालेला आहे आणि शरद पवार गटाला तूतारी चिन्ह देण्यात आलेला आहे. परंतु याबाबत आता सुप्रीम कोर्टामध्ये याचीका टाकली आहे आणि याबाबत सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्याबाबत ठरवण्यात येईल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version