प्रहारचे अध्यक्ष बचू कडू यांना न्यायालयाकडून झटका, १४ दिवस न्यायालयीन कोठडी

प्रहारचे अध्यक्ष बचू कडू यांना न्यायालयाकडून झटका, १४ दिवस न्यायालयीन कोठडी

प्रहार जनशक्ती पक्षाचे ( Prahar Janshakti Party) अध्यक्ष आणि सध्या शिंदे गटात अपक्ष आमदार म्हणून सामील झालेले ओमप्रकाश बाबुराव कडू (Omprakash Babarao Kadu) म्हणजेच बचू कडू (Bachchu Kadu) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. या सुनावणीनंतर बचू कडू यांच्या समर्थकांना मोठा झटका बसला आहे.

नेहमी कुठल्या ना कुठल्या मुद्यावर चर्चेत राहणारे बचू कडू यांना न्यायालयाने चांगलीच चापरख लावली आहे. अकोल्याचे (Akola) माजी पालकमंत्री (Guardian Minister) बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील (political movement) प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. पण आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) मतदार संघाचे आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील माजी राज्यमंत्री आणि सध्या शिंदे गटात अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा देणारे बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज आज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावण्यात आला आहे. न्यायलयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले असतांना, त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा:

एमसीए निवडणुकीत शरद पवार यांचा संदीप पाटील, राजू कुलकर्णी यांना आशीर्वाद

चांगल्या भूमिका साकारता आल्या नाही, अभिनेत्री उषा नाडकर्णींनी केली खंत व्यक्त

सांगलीत मनपा स्थायी सभापतीपदी निवडणुकीत भाजपचा विजय तर, काँग्रेसच्या पदरी अपयश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version