शरद पवारांवर निशाणा साधत प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले मविआ पाडण्याचा…

शरद पवारांवर निशाणा साधत प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले मविआ पाडण्याचा…

आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर थेट आरोप केला आहे. सांगलीत प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर निशाण साधला आहे.

हेही वाचा 

World Peace Day 2022: जाणून घ्या शांतता दिनाचा इतिहास, महत्त्व आणि या वर्षासाठीची थीम

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीच्या मार्गाने सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे. असे आंबेडकरांनी म्हटले.

MPSC च्या मायाजालाने घेतला अजून एकाचा जीव, नैराश्येतून पुण्यातील तरुणाने केली आत्महत्या

वेदांता प्रोजेक्टबाबत, गुजरात आणि त्या कँपनीमध्ये करार झाला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत प्रोजेक्ट परत येणार नाही, असं सांगून आंबेडकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी फसवणूक बंद करावी तसेच आरक्षणाबाबतही ठोस निर्णय घ्यावा. असे सूचित देखील करण्यात आले.

दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीकडे घड्याळ नसेल तर त्यांचं ८० टक्के मतदान भाजपला जातं, तसंच काँग्रेसबाबत आहे. काँगेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले की, भाजपला फायदा होतो आणि वेगळे लढले की भाजपला फटका बसतो. असत म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीसह काँग्रेसला धारेवर धरलं.

राशी भविष्य : २१ सप्टेंबर २०२२- तुमचे ध्येय आणि दातृत्व याची सांगड घालण्यासाठी……

Exit mobile version