spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रस्थापित आणि विस्तापित यांचा समन्वय करून ही निवडणूक लढवुया, प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे दावे

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये सामील होणार अश्या चर्चा रंगल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये सामील होणार अश्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. आज प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात अजूनही एकमत झालेले नाही. आम्ही सुद्धा हेच सांगत आहोत. मात्र आता हे स्पष्ट झालं आहे. तिन्ही पक्षातून वेगवेगळ्या मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाविकास आघडीतील ज्या मतदारसंघात मतभेद होते , ते अजूनही आहेत. याच कारणामुळे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा चालू आहे. म्हणूनच अगोदर तुमचे भांडण मिटवा असे आम्ही त्यांना सांगत होतो. मुळात त्यांचे भांडण मिटत नसताना ते वंचितला दोष देत होते. त्यांच्यातील भांडण न मिटल्यामुळे आम्ही त्यांच्यात पडत नव्हतो. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यातील कोल्हापूर आणि नागपूर या दोन जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. आणखी पाच जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

आज एकाच विचारांची माणसं , पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. १४ ते १५ मतदारसंघांत अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी कॅटॅलिस्ट म्हणून भूमिका बजावू शकते, असे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दुर्दैवाने दोन गोष्टींची अडचण आहे, असं आम्ही मानतो. प्रस्थापित आणि विस्तापित यांचा समन्वय करून आपण ही निवडणूक लढवुया, असं आम्ही सांगत होतो. मात्र याला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा याला नकार होता. त्यामुळेच ते आम्हाला दोन आणि तीन जागा देऊ असे सांगत होते. तसेच आमची एक दुसरी देखील अडचण आहे. ती अडचण मला राहुल गांधी त्यांच्या मुंबईमधील सभेतून दिसून आली आहे. निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षाला अंगावर घ्यावं लागत. टीकेला शस्त्र करावं लागतं. त्या सभेत मी अनेक गोष्टी मांडू शकतो आणि त्यांची अडचण होऊ शकतो त्यामुळे मला पाच मिनिटे देण्यात आली. भाजप, संघ यांना अंगावर घेण्याची आमची ताकद आहे. ही मविआसाठी अडचणीच आहे. दुसरं म्हणजे विस्थापितांना सत्तेत सहभागी करून घेणं याला प्रस्थापितांनी कायम विरोध केला आहे. हेच मविआतही दिसलं, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रस्थापित नेत्यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना सर्व पक्ष ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे तिथे वंचितांसाठी जागा नाही. आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. इलेक्ट्रोल बाँड हा विषय निवडणुकीत महत्त्वाचा राहील. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय मुद्द्यांसह इतर मुद्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. २०१९ साली निवडणुकीत आम्ही आठ जागांवर काँग्रेस आणि एनसीपीमुळे पराभूत झालो. आमच्यामुळे त्यांना अनुसूचित जातीची मत मिळाली. मात्र काँग्रेस आणि एनसीपीने आम्हाला मिळणारी मुस्लीम समाजाची मतं घेतली . आम्हाला मुस्लीम मतं मिळाली असती तर आम्ही जिंकलो असतो,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका, बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी…

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, दिल्लीत आज महत्वाची बैठक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss