Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाने आरक्षण बचाव यात्रा काढली होती. या यात्रेला चैत्यभूमी, दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सुरुवात झाली. त्यानंतर वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पोहोचली तिथं प्रकाश आंबेडकर यांनी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकर नक्की काय म्हणाले ?

“शरद पवार यांनी मध्यंतरी म्हटलं होतं की- आम्ही समाजाचे २२५ आमदार निवडून आणू, त्यानंतर ओबीसींमध्ये चलबिचल निर्माण झाली यातून एका समूहाची सत्ता आणायचा प्रयत्न आहे. यातून असे दिसते की, ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे. पवारांनी समाज हा शब्द वापरल्यामुळे वातावरण चिघळलं आहे, असा घणाघात आंबेडकर यांनी केला आहे. ओबीसींनी स्वतःचे १०० आमदार निवडून आणावेत. त्यांची राजकीय ओळख ओबीसी म्हणून आहे. एवढे आमदार निवडून आणले तरंच आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवता येईल एससी आणि एसटी याचे आरक्षण संविधानिक आहे, तसेच ओबीसी आरक्षण संविधानिक झाले पाहिजे, अशी मागणीही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसंच मिळालेल्या अधिकारांच्यासोबत राहायचे की, संघटना आणि पक्षांसोबत याचा निर्णय घेण्याची आता निर्णायक वेळ आली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, ही मागणी कायदेशीर नाही” अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिल होत. मात्र आता त्यागी आरक्षण प्रश्नावरून पवार यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.

आरक्षण बचाव यात्रेच्या काय आहेत मागण्या ?

Ajit Pawar यांना दणका; Sharad Pawar गटात होणार आणखी एक आमदाराची एन्ट्री?

Heavy Rainfall : Department of Meteorology चा अंदाज पुन्हा चुकला ; पूरग्रस्त परिसरात पूर ओसरला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version