प्रकाश आंबेडकरांनी मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडावा, संजय राऊत

राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. लोणावळ्यातून शरद पवार यांनी अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंना थेट इशाराच दिला. कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर बघ, मला शरद पवार म्हणतात अशा शब्दात पवारांनी शेळकेंना ठणकावलं.

प्रकाश आंबेडकरांनी मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडावा, संजय राऊत

राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. लोणावळ्यातून शरद पवार यांनी अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंना थेट इशाराच दिला. कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर बघ, मला शरद पवार म्हणतात अशा शब्दात पवारांनी शेळकेंना ठणकावलं. ‘शरद पवारांची ती धमकी नसून तो एक इशारा होता.’ असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आज सकाळी धाराशिवमध्ये माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, ‘ ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षामुळे हे महाशय (अजित पवार) निवडून आले, ते जर शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे ?’ असा सवालही राऊत यांनी विचारला.

तसेच पुढे राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, चोर आणि लफंगे पात्र ठरले. नार्वेकरांकडून घटनेची पायमल्ली करत शिंदे गटाला पात्र ठरवलं. नार्वेकरांनी दिलेला निकाल कोर्टाच्या निर्णयाशी विसंगत आहे. नार्वेकरांनी १० पक्षांतरे केली. सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा होती. लवादाने चोरमंडळाच्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आशावादी आहे. बाळासाहेबांचे अस्तित्व मान्य करत नाहीत हा शिंदे गटाचा बनावटपणा आहे. चोरमंडळाच्या वकिलांकडून रोज नवे मुद्दे आहेत. रोज नवे मुद्दे आणण्याची गरज काय ? तर प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, आघाडीत सर्वांचाच मनारप्रमाणे होत नाही. प्रकाश आंबेडकरांनी मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडावा. वंचित अधिकृतपणे मविआ घटक आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल, त्यांच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायचे असेल,तर भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version