Sunday, July 7, 2024

Latest Posts

Ambadas Danve शिवीगाळ प्रकरणावरून Prasad Lad आक्रमक, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन

विधान परिषदेत (Maharashtra Assembly Monsoon Session) काल (सोमवार, १ जून) शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपच्या प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात जोरात खडाजंगी झाली. यावेळी अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळसुद्धा केली. त्यामुळे आता प्रसाद लाड आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली. त्यात आज (मंगळवार, २ जून) त्यांनी विधान परिषदेचे कामकाज सुरु होण्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून एकटेच आंदोलन केले. त्यामुळे आज पुन्हा विधिमंडळात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

काल लोकसभेत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरून विधानपरिषदेत गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आणि याचा शेवट भाजप आमदार प्रसाद लाड आणि शिवसेना उबाठा आमदार अंबादास दानवेयांनी एकमेकांना शिव्या देईपर्यंत झाला.

यावर आज प्रसाद लाड माध्यमांशी संवाद साधत म्हणाले, “ज्या पद्धतीने अंबादास दानवे यांनी माझया आई-बहिणीचा उच्चर केला हे चुकीचं आहे. विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. याबद्दल मला उद्धव ठाकरे यांना देखील विचारायचे आहे. मी किती बहादूर आहे, हे दाखवायचा प्रयत्न दानवे यांनी केला. आम्हीसुद्धा लालबाग परळ मध्ये मोठे झालो आहोत,” असते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलंय. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी माफी मागितली पाहिजे. शिक्षा एक दिवस असेल किंवा एक तासाची असेल. प्रश्न हा आहे कि आरोपीला हंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. शिक्षा आणि राजीनामा झालाच पाहिजे. उद्धव ठाकरेँनीदेखील यासंदर्भात त्यांना जाब विचारायला पाहिजे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

संजय राऊतांकडून राहुल गांधींची पाठराखण करत साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा, म्हणाले…

Monsoon session: झोपड्यांवरील अनधिकृत मजल्यांवर होणार कारवाई, मुंबईतील झोपड्यांचे सॅटलाईट मॅपिंग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss