spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रसाद लाड यांना अमोल कोल्हेंनी जोडले कोपरापासून हात

एकिकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

एकिकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू झाला आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया येत आहेत. तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाडांसमोर जोडले कोपरापासून हात जोडले आहेत.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी तर त्यांच्या या वक्तव्यानंतर कोपऱ्यापासून हात जोडले आहे आणि “काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! तुम्हाला चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात घेण्याची गरज आहे”, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणालेत.

 अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा? टीपः- हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार!, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांच्या विधानाचा निषेध केलाय.

नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड – 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, गुलाबराव पाटील संतापले

मुख्यमंत्री शिंदे नागपुरात दाखल होण्यापूर्वीच, विमानतळावर कर्नाटकची माहिती देणारे पोस्टर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss