वादग्रस्त वक्त्यवानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी

वादग्रस्त वक्त्यवानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी

एकिकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात ( Konkan) झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्याची दिलगिरी व्यक्त केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त (Apologize) करतो,” असे प्रसाद लाड यांनी सांगितलं.

कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर (Raigad) स्वराज्याची शपथ घेतली,” असे प्रसाद लाड यांनी म्हटलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,” असा सल्ला राष्ट्रवादीने दिला.

हे ही वाचा : 

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले

Bigg Boss 16 : शिव ठाकरेंमुळे संपूर्ण घरातील सदस्यांच्या डोळ्यात आले अश्रू

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्र्यांसोबत केली समृद्धी महामार्गाची पाहणी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version