Sushma Andhare : ‘सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा’ शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची खोचक टीका

Sushma Andhare : ‘सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा’ शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची खोचक टीका

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणामुळे सुषमा अंधारे हे नाव जास्तच चर्चेत आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करणं सुरूच आहे. मोदींची नकल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र तरी देखील त्यांची टीका सुरूच आहे. मात्र, आता अंधारे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.. सुषमा अंधारे या कोण आहेत, त्यांनी आपला इतिहास तपासावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.

प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय म्हटलं?

प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला लोकांची विकास कामे करायची आहेत. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे. अशी जर एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

 हेही वाचा : 

T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दुसरा धोनी मिळाला, सुरेश रैनाने ‘या’ खेळाडूकडे बोट दाखवले

सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. अशी एखादी व्यक्ती जर मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.

मला सुषमा अंधारे यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. मला विकास करायचा आहे. मी मीरा भाईंदरचा विकास करणार आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

शिंदे सरकारमधील अस्वस्थतेवर अजित पवारांनी साधला निशाणा म्हणाले, ‘थोडं थांबा, सुरू झालंय…’

शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे या दसरा मेळाव्यानंतर राज्यभर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि पक्षाचे आमदार-खासदार उद्धव ठाकरेंच्या कळपातून बाहेर पडत असताना सुषमा अंधारे या पक्षात दाखल झाल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्यावाढदिवसाचं निमित्त साधत पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यातील त्यांचं भाषणही (Speech) चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानेही त्यांनी राज्यभर भाजपविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी केली असून पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हादेखील झाला. मात्र अंधारे यांचे टीकेची मालिका काही केल्या संपत नाही आहे.

राशी भविष्य १६ ऑक्टोबर २०२२ , आपल्या व्यवहाराबाबतची गुप्तता पाळणे तुमच्या हिताचे ठरेल

Exit mobile version