Saturday, July 6, 2024

Latest Posts

Amol Mitkari यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे, Pravin Darekar यांचा इशारा

भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यावर प्रतिक्रिया देत "अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे," असे वक्तव्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीत काही आलबेल नसल्याच्या चर्चा आता चालू झाल्या आहेत. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘अजित पवार व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यायला हवे,’ असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. तसेच पुण्यातील ड्रग्स प्रकरणावरून (Pune Drugs Case) भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर सुद्धा टीका करत, “चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते,” अशी सोशल मीडिया पोस्ट केली होती. आता भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यावर प्रतिक्रिया देत “अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे,” असे वक्तव्य केले आहे.

प्रवीण दरेकर यांनी आज (मंगळवार, २५ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. पक्षाने पाहावे, त्यांना काय अधिकार आहे. त्यांची बाष्पळ बडबड असते. मागच्या एका प्रकरणात त्यांना प्रदेशाध्यक्ष यांनी समज दिली होती महायुतीत तडा जाणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करू नये आपण बोलून जाता ते महायुतीला हानिकारक आहे, प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना हानिकारक असल्याचे सांगावे,” असे ते म्हणाले.

पुण्यातील ड्रग्स प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असून राजकीय नेते यावरऔन आरोप प्रत्यारोप करत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्याचे माजी पालकमंत्री आणि महायुतीतील सहकारी चंद्रकांत पायातील यांच्यावरच टीकेची तोफ डागली. आपल्या अधिकृत ‘X’ हॅण्डलवरून ते म्हणाले, “चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत.”

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss