राजकारणात भाऊ बहीण एकत्र.. Pravin Darekar यांची Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

राजकारणात भाऊ बहीण एकत्र.. Pravin Darekar यांची Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) पदाधिकारी मेळाव्यात काल (गुरुवार,२५ जुलै) महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण योजनेवर’ (Ladki Bahin Yojana) टीका करत राज्याच्या तिजोरी एवढा पैसा आहे का? असा सवाल विचारला होता. तसेच, लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष व्यवस्थित चालले असते,’ असा टोलाही त्यांनी मारला होता. आता, त्यावर भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, “राज ठाकरे यांची त्यांच्या मिश्किल शैलीतून अशा प्रकारच्या कोट्या प्रकारची वक्तव्य येत असतात. राजकारणात भाऊ बहीण एकत्र राहायला पाहिजे ही भावना चांगली आहे. भाऊ-भाऊ, वडील-मुलगा एकत्र राहत नाही. त्यामुळे राजकारणात एकत्र राहून घरच्यांनी राजकारण करावे एवढी प्रगल्भता अजून आलेली नाही. किंबहुना ती सवय झालेली आहे. घरातले तीन दिशेला तीन नातेवाईक असू शकतात नव्हे ते आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपच मांडला. यावेळची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. सध्या कोण कोणत्या पक्षात आहे हे काही समजत नाही. पण येत्या विधानसभा निवडणुकीत मोठं घामासन होईल. सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होईल ते न भूतो असेल, असं भाकीतही राज ठाकरे यांनी वर्तवलं. विधानसभा निवडणुकीतील अजेंडा काय असला पाहिजे यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. ते फक्त लाडका बहीण आणि लाडका भाऊ करत आहेत. राज्यातील प्रश्नांकडेही लक्ष दिलं पाहिजे. राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देणं हेच तुमचं विधानसभेतील कँपेन असलं पाहिजे. हाच तुमचा प्रचार असला पाहिजे, असं सांगतानाच एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका लढायच्या हे योग्य नाही. त्याने हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.

हे ही वाचा:

विविध क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला, Father Francis Dibrito यांना CM Shinde यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version