Saturday, July 6, 2024

Latest Posts

काहीजण Manoj Jarange Patil यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारला लक्ष करत आहेत, Pravin Darekar यांची टीका

भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची आज (गुरुवार, १३ जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी, विविध विषयांवर भाष्य केले.

भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची आज (गुरुवार, १३ जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी, विविध विषयांवर भाष्य केले. लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) मध्ये महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) मिळालेल्या अपयशाबाबत भाष्य करत ‘पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात काम सुरू केले आहे,’ असे वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले, “भाजप जय पराजय झाल्यावर विश्लेषण करून पुन्हा कामाला लागते. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम सुरू केले आहे. उद्या पुन्हा एकदा आत्मचिंतन करू.”

ऑर्गनायजर (Organiser) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुखपत्रातील भाजप राष्ट्रवादीवर करण्यात आलेल्या टीकेवर ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मातृतुल्य संघटना आहे. भाजप हा संघाचा संस्थात्मक भाग आहे. जेव्हा मार्गदर्शन सल्ला सरसंघचालक करतात त्यानुसार आम्ही वाटचाल करतो. इंडिया शायनिंगवेळीही विवेक पक्षिकातून टिप्पणी कर्ली होती. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही दुरुस्त्या करतो. भाजपची व्हॅल्यू कमी झाली नाही. गरज सरो वैद्य मरो अशी भाजपची पद्धत नाही. एका अपयशाने सहकाऱ्याला सोडणे योग्य नाही.”

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर भाष्य करत ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन. सरकार सकारात्मक आहे. काही जण जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारला लक्ष करत आहेत. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. जरांगे यांनी सरकारशी संवाद ठेवावा.” मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज (गुरुवार, १३ जून) आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी राज्यसरकारच्या वतीने आज अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगेसोयरेंच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपोषण स्थगित करत राज्य सरकारला (Maharashtra Govenment) १ महिन्याचा अवधी दिला आहे.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांचे उपोषण स्थगित, Maha Govt ला दिला एक महिन्याचा अवधी

Sunetra Pawar होणार खासदार, राज्यसभेवर झाली बिनविरोध निवड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss